Acupuncture and Acupressure: The Need for Time
ॲक्युप्रेशर मध्ये रिफ्लेक्सोलाॅजी, सुजोक, शिआत्सु, व्यॅक्युम इ. उपचारांचा समावेश होतो. विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आजार बरे करण्याची अद्भुत पद्धत म्हणजे ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशर ही उपचारा बरोबरच निदान करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे.
ॲक्युप्रेशर ही निसर्गनिर्मित उपचार पद्धती असून कोणत्याही साईड इफेक्ट चे यात भय नाही. ॲक्युप्रेशर पद्धतीने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक्षमता वाढवून आजार बरा केला जातो.
सर्दी तापापासून ते कॅन्सर पर्यंत आणि अगदी नवजात शिशू पासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना ॲक्युप्रेशर द्वारे उपचार लाभदायक आहे. खुप जूने क्रॉनिक आजारही ॲक्युप्रेशर उपचाराने काही दिवसातच बरे होऊ लागतात. ज्यांना ऍलोपॅथी औषधांची ऍलर्जी आहे किंवा रेझिस्टन्स निर्माण झाले आहे त्यांच्यासाठी तर ॲक्युप्रेशर उपचार हा संजीवनीच ठरतो.
#ॲक्युपंचर
ॲक्युपंचर मध्ये विशिष्ट बिंदूंवर निडल्स लावून उपचार केले जाते. ॲक्युपंचर हे आयुर्वेदा प्रमाणेच संपूर्ण आरोग्य विज्ञान आहे आणि महत्वाचे म्हणजे ही दोन्ही शास्त्र आयुर्वेद व ॲक्युपंक्चर जितकी प्राचीन आहेत तितकीच ती शास्त्रशुद्ध निसर्ग नियमांवर आधारित आहेत आणि म्हणूनच प्रभावी सुद्धा आहेत.
ॲक्युपंचर उपचाराने शरीरातील निरनिराळ्या मेरिडियन्स मधून वाहणाऱ्या ऊर्जेचा प्रवाह रेग्युलरेट केल्या जातो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराचा आंतरिक त्रास कमी होऊन शरीर वेदनारहित होऊ लागते. ॲक्युपंचर च्या होमिओस्टेटिक परिणामामुळे रक्तदाब, हृदयाची धडधड , शरीराचे तापमान आणि दुसऱ्या अनेक जीवनोपयोगी पॅरामीटर्स चे नियमन करण्यासाठी मदत होते. पक्षाघातात ॲक्युपंचर उपचार स्नायूंच्या कार्यात वेगाने सुधारणा करतो. ॲक्युपंक्चर उपचार है नैराश्य, अनिद्रा इत्यादी मानसिक विकारांवर ही उपयुक्त आहे.
लेख: डॉ. निलम अग्रवाल, जळगाव
#Agrawal_Acupuncture_Center
#Acupuncture
#Reflexology_Acupuncture
Follow us on Facebook: www.facebook.com/AgrawalAcupunctureCenter
Follow us on Facebook: www.facebook.com/AgrawalAcupunctureCenter

Comments
Post a Comment