अक्युप्रेशर : टाच दुखीवर उत्तम उपचार
अक्युप्रेशर : टाच दुखीवर उत्तम उपचार
टाच दुखीच्या रुग्णांसाठी सकाळी उठल्यानंतर पडणारे पहिले पाऊल अतिशय त्रासदायक असते. या वेळी रुग्णांना सर्वाधिक कळ जाणवते.
उभे असताना किंवा चालताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतो. शरीराचा भार पेलता यावा यासाठी तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यात प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. एखाद्या स्प्रींगप्रमाणे शरीराचा भार सांभाळण्याचे काम या स्नायूकडून केले जाते. हे स्नायू दुखावले तर टाचदुखी सुरू होते. तळव्यांवर अधिक भार आल्यास, शरीराचे वजन वाढल्यास टाचांचे दुखणे सुरू होते. कामाचा ताण, जीवनसत्त्वांचा अभाव, पुरेशी विश्रांतीचा अभाव तसेच तळव्यांचे हाड वाढल्यामुळे तळव्यांना सूज येते आणि असह्य वेदना सुरू होतात.
हा त्रास कमी करण्यासाठी पेनकिलर ने गुण आला नाही तर एक्सरे काढणे, इंजेक्शन देणे आणि अखेरीस शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो म्हणून या छोट्या दिसणार्या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य #अक्युप्रेशर अक्युपंक्चर उपचार करुन घ्यावे.
एवढं अवश्य करा:
- फ्रीजची कोणतीही वस्तू सेवनाचे करु नये .थंड पाणी, कोल्ड ड्रिंक किंवा आईसक्रीम बिलकुल बंद करावे. ए.सी. कुलर चा वापर करु नये .
- सूर्यास्तानंतर शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे.
- कोमट पाण्यात मीठ टाकून पाय शेकून घ्यावे.
पुढील दाखविलेल्या बिंदूंवर सकाळ संध्याकाळ नियमितपणे दाब देऊन उपचार करावा. #अक्युप्रेशर उपचाराने सर्वच दुखण्यांवर त्वरित आराम मिळते. टाच दुखी च्या रुग्णांसाठी तर ॲक्युप्रेशर उपचार हे वरदाना सारखे साबित होते. जर आजार खूपच जास्त वाढलेला असेल तर ॲक्युपंक्चर उपचाराची आवश्यकता असते.
लेख: डॉ. निलम अग्रवाल, जळगाव
#Dr_Neelam_Agrawal
#Agrawal_Acupuncture_Center
#Acupuncture
Follow us on Facebook: www.facebook.com/AgrawalAcupunctureCenter
#Agrawal_Acupuncture_Center
#Acupuncture
Follow us on Facebook: www.facebook.com/AgrawalAcupunctureCenter

Comments
Post a Comment