Posts

मनुष्याच्या पूर्णत्वाची झलक- ॲक्युप्रेशर

Image
मनुष्याच्या पूर्णत्वाची झलक- ॲक्युप्रेशर   आपण पाहिलं ॲक्युप्रेशर ही औषध व ऑपरेशन शिवाय रोग बरे करण्याची आश्चर्यजनक उपचार पद्धती आहे. निसर्गाने मानव शरीरात अनंत रहस्य दडवून  ठेवली आहेत.  बृहदारण्यक उपनिषद्‌च्या या मंत्राने मला नेहमीच विचार करण्यास भाग पाडले, ऊँ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्‌ पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ओम शांती! शांती!! शांती!!! या मंत्राचा अर्थ असा कि ते पूर्ण आहे हे पण पूर्ण आहे, पूर्णातून पूर्णच उत्पन्न होते आणि जर पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते! अद्भूत ! थोडं विषयांतर झालं, परंतु खरंच मनुष्य पूर्णच आहे. जसजसे आपण ॲक्युप्रेशर शास्त्राचे सखोल अध्ययन करत जातो, आपल्याला हे पावलोपावली जाणवू लागतं, पटू लागतं. तर पुन्हा विषयावर येत ॲक्युप्रेशर बाबत जाणुन घेऊन पूर्णत्वाची एक झलक - निसर्गाने कसे आपल्या शरीरात ऑटो रिपेरिंग सिस्टम बनवून ठेवले आहे, ते पाहूया. #रिफ्लेक्स पॉईंट: आपल्या हातापायाच्या पंज्यावर आपल्या संपूर्ण अवयवांचे स्विच बटन सारखे बिंदू आहेत. सूक्ष्मतेने पाहिले अस...

Acupuncture and Acupressure: The Need for Time

Image
काळाची गरज: ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर अनेक आजारांनी त्रस्त, निरनिराळ्या चाचण्या करून थकलेल्या, औषधं घेऊन त्यांच्या साईड इफेक्ट्सनी बेजार झालेल्या रुग्णांसाठी ॲक्युप्रेशर  उपचार ही काळाची गरज बनली आहे. या पद्धतीने अनेक आजारात  मिळालेल्या उत्तम रिझल्ट मुळे मागील काही दशकात ॲक्युप्रेशर चे भरपूर प्रचार आणि प्रसार झाले आहे व आज जगभरात  ती लोकप्रिय  उपचार पद्धती  म्हणून  नावाजली जात आहे. ॲक्युप्रेशर मध्ये  रिफ्लेक्सोलाॅजी, सुजोक, शिआत्सु, व्यॅक्युम इ. उपचारांचा समावेश होतो.  विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आजार बरे करण्याची अद्भुत पद्धत म्हणजे ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशर ही उपचारा बरोबरच निदान  करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. ॲक्युप्रेशर ही निसर्गनिर्मित उपचार पद्धती असून कोणत्याही साईड इफेक्ट चे यात भय नाही. ॲक्युप्रेशर पद्धतीने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक्षमता वाढवून आजार बरा केला जातो. सर्दी तापापासून ते कॅन्सर पर्यंत आणि अगदी नवजात शिशू पासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना ॲक्युप्रेशर द्वारे उपचार लाभदायक आहे. खुप जूने क...

रिफ्लेक्सोलाॅजी अक्युप्रेशर

Image
रिफ्लेक्सोलाॅजी अक्युप्रेशर सावधान, रस्त्यावरचे खड्डे तुमच्या पाठीच्या् कण्याला तरी धक्का पोहोचवत नाहीत ना??            रस्त्यावरील खड्ड्यांनी फक्त गाडी चालविणेच मुश्कील केलेले नाही तर सर्वसामान्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण करीत आहे. खड्ड्यामुळे होणारे पाठीचे विकार, प्रदूषणाचा त्रास, श्वसनविकार, मानसिक खच्चीकरण ही त्याची वेगवेगळी रुपं. रस्त्यावर खड्ड्यांमुळे होणारी कसरत केवळ रोजची डोकेदुखी राहिली नसून मानसिक ताण, संताप अशा विकारांचेही कारण बनली आहे.          यामुळे सर्वात मोठी हानी होत आहे ती पाठीच्या कण्याची. आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी प्रत्येक तिसरा रुग्ण हा मान दुखी वा कंबर दुखी वा सायटिका हे आजार घेऊन आलेला असतो आणि या आजारांचे मोठे श्रेय रस्त्यातील खाचखळग्यांना जाते. त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.           माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देणारा महत्त्वाचा अवयव म्हणजे त्याच्या पाठीचा कणा. माणसाला स्वतंत...

अक्युप्रेशर : टाच दुखीवर उत्तम उपचार

Image
अक्युप्रेशर  : टाच दुखीवर उत्तम उपचार टाच दुखीच्या रुग्णांसाठी सकाळी उठल्यानंतर पडणारे पहिले पाऊल अतिशय त्रासदायक असते. या वेळी रुग्णांना सर्वाधिक कळ जाणवते. उभे असताना किंवा चालताना शरीराचा भार गुडघे, पावले आणि पायांच्या तळव्यावर येतो. शरीराचा भार पेलता यावा यासाठी तळव्यांची रचना वक्राकार पद्धतीने करण्यात आली आहे. या तळव्यात प्लान्टर फेशिया हा स्नायूंचा पडदा असतो. एखाद्या स्प्रींगप्रमाणे शरीराचा भार सांभाळण्याचे काम या स्नायूकडून केले जाते. हे स्नायू दुखावले तर टाचदुखी सुर ू होते. तळव्यांवर अधिक भार आल्यास, शरीराचे वजन वाढल्यास टाचांचे दुखणे सुरू होते. कामाचा ताण, जीवनसत्त्वांचा अभाव, पुरेशी विश्रांतीचा अभाव तसेच तळव्यांचे हाड वाढल्यामुळे तळव्यांना सूज येते आणि असह्य वेदना सुरू होतात. हा त्रास कमी करण्यासाठी पेनकिलर ने गुण आला नाही तर एक्सरे काढणे, इंजेक्शन देणे आणि अखेरीस शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो म्हणून या छोट्या दिसणार्‍या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य  # अक्युप्रेशर  अक्युपंक्चर उपचार करुन घ्यावे. एवढं  अवश्य करा:  फ्...