मनुष्याच्या पूर्णत्वाची झलक- ॲक्युप्रेशर




आपण पाहिलं ॲक्युप्रेशर ही औषध व ऑपरेशन शिवाय रोग बरे करण्याची आश्चर्यजनक उपचार पद्धती आहे. निसर्गाने मानव शरीरात अनंत रहस्य दडवून  ठेवली आहेत. 

बृहदारण्यक उपनिषद्‌च्या या मंत्राने मला नेहमीच विचार करण्यास भाग पाडले,

ऊँ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्‌ पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ओम शांती! शांती!! शांती!!!

या मंत्राचा अर्थ असा कि ते पूर्ण आहे हे पण पूर्ण आहे, पूर्णातून पूर्णच उत्पन्न होते आणि जर पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते! अद्भूत !

थोडं विषयांतर झालं, परंतु खरंच मनुष्य पूर्णच आहे. जसजसे आपण ॲक्युप्रेशर शास्त्राचे सखोल अध्ययन करत जातो, आपल्याला हे पावलोपावली जाणवू लागतं, पटू लागतं.

तर पुन्हा विषयावर येत ॲक्युप्रेशर बाबत जाणुन घेऊन पूर्णत्वाची एक झलक - निसर्गाने कसे आपल्या शरीरात ऑटो रिपेरिंग सिस्टम बनवून ठेवले आहे, ते पाहूया.

#रिफ्लेक्स पॉईंट:
आपल्या हातापायाच्या पंज्यावर आपल्या संपूर्ण अवयवांचे स्विच बटन सारखे बिंदू आहेत. सूक्ष्मतेने पाहिले असता असे दिसते कि जणूकाही शरीराची ती छोटी प्रतिकृतीच आहे. हे बिंदू म्हणजे शरीरातील अवयवांचे रिफ्लेक्स सेंटर होत. आणि या सेंटरवर योग्य प्रकारे दाब देऊन संबंधित आजार बरे करण्याची नैसर्गिक उपचार  पद्धती म्हणजे रिफ्लेक्सोलाॅजी - ॲक्युप्रेशर .

आता पहा जर पंख्याचे बटन ऑन केलं तर पंखा चालू होतो ना. तद्वतच ॲक्युप्रेशर च्या लिव्हरच्या बिंदूवर दाब दिला तर लिव्हर ला ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो आणि त्याच्यामध्ये जर काहीही आजार असेल तर तो बरा होऊ लागतो.

एवढेच नव्हे तर या बिंदूवर दाब देऊन किंवा स्पर्श करून आजाराचे निदानही करता येते. म्हणजे समजा जर एखाद्या बिंदूवर टेंपरेचर, टेंडर नेस, थिकनेस इ. चेंज झाले असेल तर त्याचा अर्थ शरीरात काही बदल झाले आहे हे समजते, व  एक अनुभवी ॲक्युप्रेशरिस्ट, त्वरित आजाराचे निदान करून घेतो. आजाराची बाह्य लक्षणे दिसण्याच्या खूप आधीच  त्याला निदान करणे शक्य होते परिणामी कोणत्याही हाॅस्पिटल वा मेडिकल स्टोअर वर, पॅथॉलॉजी लॅब वर, धावाधाव करण्याच्या पेक्षा त्वरित आजार बरा करण्यासाठी ॲक्युप्रेशर उपचार सुरू करतो.

आणि खर्च म्हंटला तर तो किती... अत्यंत अल्प. कारण निदानासाठी निरनिराळ्या चाचण्या करण्याची गरज नाही, महागडी औषधं नाही - म्हणून त्यांची साईड इफेक्ट्स नाहीत, नि कॉम्प्लिकेशन्स नाहीत.... 
 सहजतेने आपल्या शरीरातील नैसर्गिक रित्या उपलब्ध असलेल्या ॲक्युप्रेशर पद्धतीने रोग निवारण शक्तीचा उपयोग करून मानव जातीसाठी  संपूर्ण आरोग्य, संतुलन व  शांती सहज प्राप्त करून घेता येईल

तात्पर्य काय तर आपले शरीर हे खरेच पूर्ण आहे. बाहेरच्या कोणत्याही मशीन शिवाय आजाराचे योग्य निदान करण्याची सिस्टम, आजारावर उपचार करण्याची सिस्टम आपल्या शरीरात आहेच त्यामुळे ॲक्युप्रेशर उपचाराने मणक्यांचे विकार, स्पॉन्डिलाइटिस, सायटिका, सर्दी-सायनसायटिस, तीव्र डोकेदुखी, संधिवात, अनिद्रा, मधुमेह, पक्षाघात इत्यादी आजारही बरे होऊ लागतात.

एवढेच काय आजाराला प्रिव्हेंट करण्याचे सिस्टम सुद्धा आपल्या शरीरात आहेच.

महत्त्वाचे म्हणजे अक्युप्रेशर हे शास्त्र सर्वसामान्यांनाही शिकण्यासाठी सोपे आहे. आपल्या स्वतःसाठी, आपल्या फॅमिली व फ्रेंड साठी वेळी अवेळी अतिशय कामी पडणारे हे ज्ञान मानवजातीला निसर्गाने दिलेलं वरदान आहे.  तर मित्रांनो, आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. चला तर आपण ॲक्युप्रेशर शिकून घेऊ आणि आपल्या आरोग्य - ॲक्युप्रेशर द्वारे सुरक्षित करुन घेऊ.

लेख: डॉ. नीलम नरेंद्र अग्रवाल
पत्ता: ३२,चंद्रप्रभा कॉलनी, ख्वाजामिया समोर, 
वोडाफोन स्टोर शेजारी, जळगाव, 
संपर्क: +९१ ९८५०६६९१२५, ७०२०५२८६६९

#Ayurveda
#Reflexology_Sujok_Acupressure
Follow us on Facebook: www.facebook.com/AgrawalAcupunctureCenter

Comments

Popular posts from this blog

Acupuncture and Acupressure: The Need for Time

अक्युप्रेशर : टाच दुखीवर उत्तम उपचार

रिफ्लेक्सोलाॅजी अक्युप्रेशर